बिडकीन डिएमआयसी परिसरातील कंपनीजवळ तीन लाखांचा गुटखा जप्त

Foto
बिडकीन पोलिसांची कारवाई

बिडकीन, (प्रतिनिधी) : येथील डीएमआयसी परिसरातील एका कंपनी समोर संशयीत उभ्या असलेल्या वाहनाची तपासणीत वाहनात तब्बल ८१ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गाडी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकीन पोलिसांच्या या कारवाईमुळे पसिरातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे. शनिवारी रात्री ही कारावाई करण्यात आली.

दि. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास गस्तीदरम्यान डीएमआयसीलगत टेक्नो क्राफ्ट प्रा. लि. कंपनीसमोर प्रतिकात्मक संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनावर त्यांचे लक्ष गेले. याप्रकरणी वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली दरम्यान त्यास पोलिसी खाक्या दाखवत वाहनाची तपासणी केली असता आतील भागात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या विविध पॅकेट्सचा साठा आढळून आला.

या प्रकरणी सिध्दांत गणेश ढोले रा. बालानगर ता. पैठण यास कारसह ताब्यात घेत त्यास बिडकीन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी यांनी फिर्याद दिली असून विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसाकडून प्रतिबंधित गुटख्यावर वारंवार कारवाई होत आहे असे असले तरी कारवाई नतर पुन्हा गुटखा बाजारात उपलब्ध होत असून या प्रकरणात पूर्वी पकडण्यात आलेल्या आरोपीकडून गुटखा पुरवठा करणारा मुख्यसूत्रधार कोण या बाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत समोर आले नाही.

 प्राथमिक चौकशीत आरोपीसह इतर साथीदारही या तस्करीत सामील असल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील कार्यवाही व तपास सहा. पो. निरीक्षक निलेश शेळके यांचे मार्गदर्शक सुचनेवरुन बिडकीन पोलीस करीत आहे. पोलिसानी केलेल्या या कारवाईवरुन परिसरातील गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी गुटखा व त्यामागे होत असलेल्या अनेक व्यवहारावर नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.